भारतीयांचे सामाजिक चिंतन
प्रस्तुत लघुलेख हा एका वैयक्तिक(?) जिज्ञासेची प्रकट मांडणी करण्यासाठी लिहीत आहे. ‘वैयक्तिक’ पुढे प्रश्नचिन्ह अशासाठी टाकले आहे की आजच्या बर्याचच विचारंवतांच्या मानसांतही कुठेतरी ही जिज्ञासा सुप्त स्वरूपात वास करत असावी अशी लेखकाची समजूत आहे. तसे असल्यास(च) या प्रकटीकरणाला थोडाफार अर्थ येईल.अन्यथा लेखकाने आपला वैयक्तिक शोध वैयक्तिकपणेच चालू ठेवणे इष्ट. अशाच दुसर्याअ एका गोष्टीचाही खुलासा सुरुवातीलाच …